भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या नियमानुसार बेळगावातील शासकीय कार्यालयातून मराठी परिपत्रिके देण्याची मागणी करण्यासाठी मध्यवर्ती समितीचे आवाहना नुसार ग्राम पंचायतीना निवेदन देण्याची सुरुवात बेनकनहळळीतून करण्यात आली.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी बेनकनहळी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत येथून मिळणारी विविध परिपत्रके मराठी भाषेत देण्यात यावी यासाठी सदर निवेदन देण्यात आले.पी डी ओ गंगाधर नाईक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, दत्ता उघाडे महेश जुवेकर, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील,बेळगुंदी ग्रामपंचायत सदस्य राजू किनेकर,प्रसाद बोकडे,मदन पाटील, कांतेश चलवेटकर निलेश इत्यादी युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होत. याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या मराठी माणसावर कसा अन्याय होत आहे. शिवाय मराठी भाषेतून कागदपत्रे उपलब्ध व्हावीत हे सदर सोयीच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे.याबद्दल दत्ता उघाडे,बाळासाहेब चोपडे,डॉ. राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले