गोल्फ क्लब जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बुधवारी १० आगष्ट रोजी गोल्फ क्लब जंगल परिसरातील २२ शाळाना सुट्टी देण्यात येईल असा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड याची बजावला आहे.सोमवारी मंगळवारी नंतर या 22 शाळांना बुधवारी सुट्टीत वाढ करण्यात आली आहे.
बिबट्याचा आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ क्लब जवळील शहरातील १३ आणि ग्रामीण भागातील ९ अश्या एकूण २२ शाळांना बुधवारी सुट्टी असणार आहे. सुट्टीची कल्पना पालकांना आधीच मिळावी यासाठी एक दिवस अगोदर हा आदेश जारी करण्यात आल्याचे देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.वन खात्याच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम जोरात सुरु आहे.
बुधवारी १० रोजी या खालील शाळांना सुट्टी असणार आहे.
केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि वनिता विद्यालय,मराठी विद्यानिकेतन,एन पी ई टी क्लब रोड के एल ई इंटरनॅशनल स्कुल कुवेम्पू नगर,सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर,सरकारी मराठी शाळा सदाशिवनगर यासह हनुमान नगर,सह्याद्री नगर ,कुवेम्पू नगर आणि सदाशिवनगर कन्नड प्रथिमक,सेंट झेवियर्स स्कुल, दूरदर्शन नगर कन्नड प्राथमिक शाळा आणि हिंडलगा ग्राम पंचायतीतील शाळांना अशा एकूण २२ शाळांना बुधवारी सुटटी देण्यात आली आहे .
सोमवारी अतिवृष्टी आणि मंगळवारी मोहरम अशी दोन दिवस सुट्टी संपल्यावर बुधवारी शहर आणि तालुक्यातील त्या २२ शाळा वगळता उर्वरित शाळा आता सुरु राहणार आहेत.
पोलीस विभागाने रेसकोर्स आणि गोल्फ कोर्सच्या आजूबाजूच्या भागात विशेषत: जाधव नगर, हनुमान नगर, आणि जलतरण तलाव आणि आतापर्यंत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी जारी केलेला अलर्ट पुढे ठेवला आहे
पोलिसांनी हनुमान नगर, जाधव नगर आणि आजूबाजूच्या परिसरांना बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे, स्थानिक रहिवाशांना विशेषत: अंधारात आणि पहाटेच्या वेळी विनाकारण फिरू नये असा इशारा दिला आहे.