श्रावण महिन्यात सगळीकडे मंगळागौरीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जायंट्स सखी आणि नाविण्या ग्रुपच्या वतीने झिम्मा-फुगडी घालत, आगोटा असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळून महिलांनी मंगळागौरीचा सण साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील फुलबाग गल्ली येथे जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी आणि नावीन्य ग्रुपच्या वतीने मंगळागौरी उत्सवानिमित्त पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपारिक वेशभूषा करून महिलांनी मंगळागौरी सणानिमित्त सादर होणाऱ्या पारंपरिक खेळांमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिला झिम्मा-फुगडी, आगोटा, सासू-सुनेचे भांडण, सासू-नणंदेचे भांडण, ऐटीत नवऱ्याचे नाव घेत उत्साहात थिरकल्या.
या उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणच्या मैत्रिणींना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळांमध्ये सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिलांनी आपल्या पतीराजांचे नाव घेत आनंदोत्सव साजरा केला.
जायंट्स ग्रुप ऑफ सखीच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे याही वेळी आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने मंगळागौरी उत्सवासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. चंदा चोपडे यांच्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचवेळी नाविन्या रॉक्स ग्रुपच्या सदस्यांनीही यावेळी सांगितले की, आम्ही १६ मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आलो आणि आम्ही हा सण साजरा केला. आपली संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केला जातो.
या प्रसंगी सविता क्षीरसागर, सुवर्ना भक्तीकर, वर्षा खुंटे, ममता सिंगबाल, अपर्णा पाटील, सुनीता काशीद, गौरी, दीपाली परमाज, शुभांगी उचगावकर, स्वाती खंडोजी, मोनाली परब, स्मिता कुलकर्णी, प्रेम शास्त्री, दीप कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.
सर्व उपस्थित सखींनी विविध पारंपरिक, सांस्कृतिक खेळांमध्ये जल्लोषाने भाग घेतला आणि एकमेकीना शुभेच्छा दिल्या.
या वेळी जायंट्स सखी च्या अध्यक्षा चंद्रा चोपडे, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, माजी अध्यक्षा निता पाटील, सेक्रेटरी सुलक्षणा शिन्नोळकर ,फेडरेशन संचालिका नम्रता महागांवकर ज्योती पवार, ज्योती सांगुकर, सुर्वणा काळे तसेच सखीच्या सदस्या उपस्थित होत्या
बेळगावात रंगला जायंट्स सखींचा असा मंगळा गौर #श्रावणमहोत्सव2022 #बेळगावमंगळागौर#BelgaumLive pic.twitter.com/ETPjUGKdw3
— Belgaumlive (@belgaumlive) August 18, 2022