गणेशोत्सव अजून काही दिवसावर असला तरी चतुर्थीच्या तीन दिवस अगोदर सार्वजनिक अनेक मंडळांनी गणपतीचे आगमन केलेले आहे.
श्री गणेश मूर्ती आपल्या मंडळात आणून योग्य ठिकाणी ठेवणे आणि चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे आगमन होताना घरगुती गणपती आणताना त्रास गडबड होऊ नये यासाठी अगोदर केलेला आगमन सोहळा उपयुक्त ठरत असतो.
चतुर्थीच्या दिवशी सगळेजण घरच्या गणपती उत्सवात सामील होतात आणि त्यावेळी कार्यकर्ते इतर कामात मग्न असताना सार्वजनिक गणपतीची अवहेलना किंवा आबाळ होऊ नये या दृष्टिकोनातून ते पूर्व तयारी म्हणून गणेशाची मूर्ती आणून आपल्या मंडळाच्या आसपास ठेवतात आणि चतुर्थीला प्रतिष्ठापना करतात.
बेळगाव शहरातल्या उत्तर भागांमधल्या जाल्गार गल्ली येथील लालबहादूर शास्त्रीय युवक मंडळाने रविवारी आपल्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा केला अशा बेळगावला अनेक मंडळांनी रविवार रविवारपासूनच गणेश मूर्ती आणायला सुरुवात केली आहे रविवार सोमवार मंगळवार असे तीन दिवस आता आगमन सोहळे बेळगाव शहरात रंगणार आहेत आणि बुधवारी चतुर्थीला या गणपती बाप्पाची मंडपामध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
रविवारी रात्री बेळगाव शहरातील अनेक गणेश मंडळांनी आगमन सोहळे आयोजित केले होते रात्री मिरवणुकीसह गणेश मूर्ती मंडपाच्या जवळ आणून ठेवल्या आहेत.