मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्याचे भवितव्य उज्वल होण्यासाठी शैक्षणिक पाया मजबूत होणे गरजेचे आहे त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.वनिता पाटील पूर्व प्राथमिक शाळेने वडगांव भागांत हे काम सुरू केलेले आहे ते कौतुकास्पद आहे असे मत सॉफ्टवेअर इंजिनीअर अमित देसाई यांनी व्यक्त केले.
वडगांव येथील वनिता पाटील प्रि प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमआयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना बेळगाव liveचे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना सकस शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते किरण हुद्दार यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांची प्रशंसा करत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गुणवंत पाटील यांनी उत्कृष्ट शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे काम ही संस्था करत आहे असे सांगितले.
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर विध्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही पार पडला.संचालक शरद नाईक शिक्षकवर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. कविता फडके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.