बेळगाव गोल्फ मैदान परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडले आहे. वनखात्यातर्फे या ठिकाणी बसविण्यात आलेल्या 10 क्रमांकाच्या कॅमेऱ्याने बिबट्याची छबी टिपली असून या छबीमध्ये काल रात्री 10:22 वाजण्याच्या सुमारास बिबट्या गोल्फ मैदानावर वावरतानाचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे वनखाते आता फुल अलर्ट झाले आहे.
गोल्फ मैदान परिसरात ज्या ठिकाणी कॅमेऱ्याने बिबट्याची छबी टिपली त्या भागावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने जेसीबीच्या सहाय्याने संबंधित भागातील झाडेझुडपे हटविण्याचे काम आज गुरुवार सकाळपासून हाती घेण्यात आले आहे.
डीएएफ अँथोनी मरिअप्पा आणि एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून आज दुसऱ्या दिवशीही गोल्फ मैदान परिसरात बिबट्याची शोध मोहीम जारी होती.
बिबट्याचा माग काढून त्याला पकडण्यासाठी गोल्फ मैदानपरिसरात श्वानपथकांमागोमाग हत्तींना पाचारण करण्यात आल्यानंतर शोध कार्य सोपे व्हावे आणि बिबट्याला उघड्यावर आणण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने झाडे झुडपे हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे हत्तींचा मार्ग सुकर व्हावा यासाठी गोल्फ मैदानाबाहेरील परिघात जवळपास 7 कि.मी. अंतराचा कच्चा रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या खेरीज गोल्फ मैदानाबाहेर आसपासच्या भागातील झाडे झुडपे रान काढून स्वच्छता केली जात आहे.
आता जे सी बी चा वापर
रेस कोर्स मैदानावर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जे सी बी चा वापर pic.twitter.com/ybjprZmZSE
— Belgaumlive (@belgaumlive) August 25, 2022