जत्ती मठ येथे बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा वाढदिवस अनेकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.एका ध्येय वेड्या तरुणाने बेळगाव लाईव्हया डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बेळगावात एक वेगळे पर्व निर्माण केले.तत्कालीन परिस्थितीत या माध्यमाची विशेष माहिती नसताना या क्षेत्रात प्रदार्पण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.आज आघाडीवर असणारे हे डिजिटल न्युज चॅनेल बेळगावचा मानबिंदू ठरत आहे.अनेक क्षेत्रातील लोकं बेळगाव लाईव्हशी जोडले गेले त्याचाच परिपोष म्हणजे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेला हा नागरी सत्कार.
अभियंते अमित देसाई यांनी प्रास्तविक करताना बेळगाव लाईव्ह हे बेळगाव परिसरातील मराठी माणसाचे डिजिटल मुखपत्र आहे व ते गेल्या काही वर्षापासून सामान्य माणसाचा आवाज बनलेआहे. यासाठी हे मुखपत्र उभे करणाऱ्या पत्रकाराचा सन्मान करणे गरजेचे होते यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले,मराठा समाज आणि मराठी माणूस यांचा आवाज म्हणजे बेळगाव लाईव्ह, हे पोर्टल बेळगावात अधिक सदृढ होण्याची गरज आहे यासाठी संपादक प्रकाश बेळगोजी यांना शुभेच्छा.
शिवसंत संजय मोरे यांनी शुभेच्छा देताना बेळगावच्या भूमीत घट्टपणे पाय रोवून उभा राहिलेल्या बेळगाव लाईव्हला रायगड एवढ्या विशाल भक्कम शुभेच्छा व्यक्त केल्या, तर माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी बेळगावची जनता प्रकाश बेळगोजी आणि लाईव्ह च्या पाठीशी उभी आहे, त्यांनी मिळवलेला सर्व समावेशक लौकिक हा बेळगावसाठी आशादायक आहे.युवा आघाडीचे संतोष मंडलिक आणि युवा समितीचे धनंजय पाटील यांनी युवकांचे आशास्थान म्हणजे बेळगाव लाईव्ह असे मत प्रदर्शित करून शुभेच्छा दिल्या.
दत्ता उघाडे,माणिक होनगेकर आणि दिपक पावशे,दत्ता जाधव यांनी बेळगाव लाईव्हचे शहर परिसरातील स्थान अधोरेखित करत मराठी माणसासाठी बेळगाव लाईव्हने केलेल्या कार्याचे कौतुक केले.हे न्युज पोर्टल अचूक आणि जलद बातम्या देण्यासाठी या परिसरात आघाडीवर आहे ही बेळगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत व्यक्त करत हा मराठी माणसाचा आवाज अधिक मजबूत होईल असा आशावाद व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना प्रकाश बेळगोजी यांनी दिवसभर शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करत मराठा आणि मराठी माणसासाठी सतत काम करत राहील त्याच बरोबर नागरी समस्या अधिक प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगून बेळगावच्या जनतेने बेळगाव लाईव्हवर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी आभार मानताना मराठी जनतेचा आवाज असणाऱ्या बेळगाव लाईव्हच्या संपादकाचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य समजून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असे सांगितले.यावेळी माजी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर, आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील ,विजय होनगेकर,विक्रम पाटील, पत्रकार सुहास हुद्दार,सागर पाटील,किरण हुद्दार,रोहन लंगरकांडे,शिवाजी मेणसे,विराज मुरकुंबी,राजू किणेकर, कांतेश चलवेटकर संकेत जाधव अभिषेक जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने फॉलोवर्स उपस्थित होते.