गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेला बिबट्याची दहशतीने गोल्फ कोर्स मैदान परिसरात धास्ती लागून राहिली आहे. या भागात पथदीप नसल्याने नागरिकांच्या भीतीत आणखीन वाढ होत आहे. यासंदर्भातील अनेक वृत्तांचा पाठपुरावा बेळगाव लाइव्हने सातत्याने केला असून सोमवारी पहाटे गोल्फ कोर्स मैदान, क्लब रोड या परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे.
वनविभागाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरु असूनही बिबट्या भलत्याच दिशेने धावत सुटला आहे. यादरम्यान शिनोळी येथील एका खाजगी कंपनीचे वाहन या मार्गावरून जात असताना वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याच्या हालचाली त्यांनी कैद केल्या असून यावेळी दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी सतर्क केले.
रात्रपाळीच्या कामगारांना शहरातून शिनोळीकडे आणण्यासाठी दाना फेअरफील्ड अटलास या कंपनीच्या तिरुपती ट्रॅव्हर्ल्स या मिनीबसचे चालक कुद्रेमानी येथील यल्लाप्पा लक्ष्मण नाईक आणि सुरज तलवार या दोघांना क्लब रोड परिसरात बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याच्या हालचाली कैद करत त्यांनी एक व्हिडीओ बनविला. सकाळी ६.१५ च्या सुमारास त्यांना हा बिबट्या दिसला आहे. याच बसमागून एक दुचाकी देखील येत होती. यावेळी दुचाकीस्वारांना त्यांनी सतर्क राहण्याचा इशाराही दिला. याचप्रमाणे या भागात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या घटनेची माहितीही दिली.
कॅम्प मधील या भागांत का आला असावा बिबट्या
गोल्फ कोर्स जंगलात घर केलेला बिबट्या वनिता विद्यालय बाजूच्या जंगलात,डेअरी फार्म असलेल्या परिसरात का आला असावा याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
या भागात एक कत्तलखाना देखील आहे. या कत्तलखान्यातील टाकाऊ मांस या भागात फेकण्यात येते. हे मांस खाण्यासाठी बिबट्या या भागातून संचार करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शिवाय दिवसभर वनविभागाची शोध मोहीम सुरु आहे. फटाके वाजवून बिबट्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु रात्रीच्या वेळी बिबट्या या भागातून संचार करत मांसाच्या शोधात सापळा रचण्यात आलेला मार्ग सोडून भलत्याच दिशेने येत असल्याचा अंदाज आहे.
बिबट्याला पाहिलेले व त्याचा व्हीडिओ बनवणारे 'ते प्रत्यक्षदर्शी' बेळगाव लाईव्ह वर एक्सक्लुजीव |Belgaum Live|
सकाळी 6:15 वाजता शिनोळीच्या अटलास कंपनीच्या रात्रपाळीच्या कामगारांना मिनी बस बसून घेऊन जातेवेळी त्यांना क्लबरोड वर दिसला बिबट्या नेमकं त्यांनी या घटनेबद्दल सांगितलंय pic.twitter.com/4IjJp98W9X— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022