बेळगावचा चिमुकला श्रीश चव्हाण यांनी कार्टव्हिल मध्ये नवा विक्रम केला असून याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. अवघ्या तीन वर्ष सहा महिने वयाचा श्रीश याने 30 सेकंदात 27 कार्टव्हिल मारत हा विक्रम नोंदविला आहे.
सदर विक्रमाबाबत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले असून एवढ्या लहान वयात त्याने केलेला विश्वविक्रम वाखाण्याजोगा असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणतेही कोचिंग नसताना केवळ आई अंजना चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून इतक्या कमी वयामध्ये कमी वेळात 27 कार्टव्हिल मारणारा श्रीश नक्कीच क्रीडा क्षेत्रात नाव कमावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या.
शिवाय यावेळी बेळगांव चे डेप्युटी डायरेक्टर जिग्नेश्वर पदनाळ यांनी देखील त्याचे कौतुक केले. आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिम्नॅस्टिक शिकवण्यासाठी बेळगाव शहरात मार्गदर्शक आवश्यक असून सर्व साहित्य उपलब्ध असून देखील केवळ मार्गदर्शक नसल्याने त्याचा उपयोग होत नाही.पुढील काळात जिम्नॅस्टिक मार्गदर्शन सुरू करण्याबाबतचां विचार असल्याचे त्यांनी सांगितले.