Thursday, December 19, 2024

/

दुसऱ्यांदा केलेली भात लावणी बाद..

 belgaum

दोन दिवसापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहापूर आणि वडगांव शिवारातील बळ्ळारी नाल्याला पुन्हा पुर असून काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यावेळी केलेली भातलावणी बरबाद झाली आहे.

मजूरांना मजूरी देण्यापेक्षा आपल्याच मुलांना,पत्नीला घेऊन छातीवर दगड ठेऊन या शेतकऱ्याने भातलावणी केली होती बळळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे ती बाद झाली आहे अशी माहिती शेतकरी नेते राजू मर्वे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

आठ दिवसाआधी लावलेला भात रोप आता पुरात बूडून गेल्याने रोप आणी खतं वापरलेली वाया आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सोसावा लागला आहे शहापूर शिवारातील छोटा शेतकरी राजू लाटूकर सारख्या अनेक शेतकऱ्यांची अशी वाईट परिस्थिती आल्याने ते मोठ्या चिंतेत आहेत.Crop loss lawaniगेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात झालेल्या नुकसानामुळे आर्थिक टंचाईत असलेला शेतकरी पेरण्या बाद झाल्यामुळे काही प्रमाणात नाराज झाला आहे शासनाने त्वरित नुकसान भरपाई मंजूर करावी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.सरकारने अशा शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भरपाई दिल्यास कांहीअंशी त्यांच्या दुखावर फुंकर मारलासारखे होईल असेही मत व्यक्त होत आहे.

बेळगाव परिसरात एकीकडे अजूनही भरपूर पावसाची गरज असताना एक एक ठिकाणी मात्र बळळारी नाल्याला पूर आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांलची किंवा लोकप्रतिनिधीची गरज सध्या व्यक्त होत आहे. ‘रयताच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये’ असं धोरण स्वराज्यात छत्रपती शिवरायांच्या काळात होत मात्र आजच्या घडीला शेतकऱ्यांचे सोयरसुतक बघणारं सरकार अस्तित्वात आहे का हाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.