अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या घरांच्या अथवा नुकसानीची भरपाई 24 तासात देण्याचा आदेश पालकमंत्री गोविंद कारजोळ व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. त्यानुसार कारवाही सुरू झाली असून काहींना 24 तर काहींना 48 तासात भरपाई मिळाली आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे सकाळी घर पडल्यास आता सायंकाळी भरपाई देण्याचे आदेश आहे. त्यामुळे घरांच्या पडझडी बाबत तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामा व अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. परिणामी यंदा 7 जणांना घरांच्या पडझड मोबदल्यात 1.94 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे वित्तहानीसह पीक हानी झाली. त्याचा अहवाल उपलब्ध झाल्यावर किती नुकसान झाले व भरपाई किती दिली आहे त्याबाबत तपशील हाती आला आहे. शिवाय भरपाई किती वेळेमध्ये दिली याची माहितीही घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 50 टक्के पेक्षा अधिक जणांना अवघ्या 24 तासात तर उर्वरितांना काहीशी उशिरा भरपाई मिळाली आहे.
भरपाई मिळण्यास विलंब होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे पालकमंत्री गोविंद कारजोळ व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी 24 तासात भरपाई देण्याचे आदेश तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना बजावले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापर्यंत 276 जणांना नुकसान भरपाईपोटी 1.94 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात सुमारे 800 घरे पडल्याची तक्रार आहे.
यापैकी नऊ घरे पूर्णतः पडल्याचा दावा आहे, तसेच 444 भागश: 6 आणि 347 अंशतः कोसळल्याची नोंद आहे. त्यापैकी अचूक दाखले आणि तपशील दिलेल्या 276 जणांना भरपाई वितरित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 524 जणांचा अहवाल प्रलंबित असून त्याची शहानिशा केली जात आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.