घर कोसळलेल्या आणि घरात पाणी शिरलेल्या नुकसाब भरपाई म्हणून २४ तासाच्या आत नुकसान भरपाई मिळाली आहे. सकाळी पाहणी सायंकाळी तात्काळ मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी सकाळी भारत नगर वडगाव येथील पावसाने पाणी शिरलेल्या आणि घर कोसळल्या घराना भेटी देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार सायंकाळी त्या कुटुंबियांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली आहे.
भारतनगर वडगाव येथील आनंद बिर्जे यांचे घर कोसळले होते त्यांना तात्काळ अशी ९५१०० रुपये नुकसान भरपाई तर भारत नगर येथील रामा वाईंगडे यांना नुकसान देखील १० हजार( जखमी पत्नी शांता वाईंगडे) आणि आंबेडकर कॉलनी अनगोळ येथील अभिषेक करिगार याना १० हजार रुपये नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी आनंद बिर्जे यांचे घर कोसळले होते त्यांना पाच लाख रुपये तर रामा वाईंगडे यांची वाहनाचे नुकसान, भिंत कोसळल्याने त्यांना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.