Thursday, January 2, 2025

/

अडीच तासाचे कोंबींग ऑपरेशन….

 belgaum

मिशन बिबट्या सर्चिंग मोहीम तीव्र करण्यात आली असून शुक्रवारी गोल्फ कोर्स जंगल परिसरात वनखाते आणि पोलीस विभाग यांच्यातर्फे संयुक्त मोहीम राबविण्यात आली. बेळगाव मधील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याबरोबरच नेमका बिबट्या आहे का? या बाबतचे चित्र स्पष्ट करण्यासाठी सदर सर्चिंग मोहिम राबविण्यात आली.

साधारण अडीचशे एकर चा गोल्फ कोर्स जंगल परिसर 300 हून अधिक वनखाते व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजून काढला. साधारण हे अडीच तासाचे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.ढोल,फटाके, एअरगन तसेच इंजेक्शन यांच्या माध्यमातून जंगल परिसराचा कोपरा कोपरा वनविभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पिंजून काढला.मात्र बिबट्या निदर्शनास आला नाही त्याच्या पाऊलखुणा देखील सापडल्या नाहीत.

नागरिकांकडून बिबट्या या ठिकाणी त्या ठिकाणी दिसला असल्याचे सातत्याने सांगण्यात येत असून याची पडताळणी करण्याबरोबरच बिबट्या रेस कोर्स परिसरात आहे का हे शोधण्यासाठी म्हणून तातडीने सदर कॉम्बो ऑपरेशन राबविण्यात आले.  आता इथून पुढे 8 पिंजरे, 22 ट्रॅप कॅमेरे तसेच पेट्रोलिंग चा माध्यमातून सदर शोध मोहीम कायम सुरू राहणार आहे.Leapord search golf course

बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी जनतेला घाबरू नये असे आवाहन केले आहे. वनविभाग आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असून कोणालाही बिबट्या निदर्शनास आल्यास तातडीने वनविभाग अथवा पोलीस विभागाशी संपर्क साधून याची माहिती द्यावी. शिवाय बिबट्या हा शांत प्राणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.Leapord mohim

बेळगांव फॉरेस्ट इसीएफ मल्लिकांत कुसनाळ यांनी आज अडीच तासाचे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असून संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढण्यात आला आहे. मात्र बिबट्या निदर्शनास आला नसून ही शोध मोहीम कायम सुरूच राहणार आहे. पेट्रोलिंग तसेच यापूर्वी बसविण्यात आलेले पिंजरे कॅमेरे यांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध सुरूच राहील असे नमूद केले आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्या जंगलात घरकरून असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले मात्र बिबट्याच्या पाऊलखुणा जरी सापडला नसल्या तरी बिबट्याच्या शोध मोहीम इथून पुढे देखील सुरूच असणार आहे.

कदाचित एकदा सापळ्यामध्ये सापडून अनुभव घेऊन आला असेल नेहमीच धूर्त आणि कपटी प्राणी म्हणून ओळखला जाणारा बिबट्या परत त्या सापळ्यामध्ये अडकणार अडकणार नाही याची शक्यता आहे त्यामुळे बेळगाव प्रशासनाला बिबट्याला जेरबन करण्यासाठी ठोस टेक्निकली सक्षम अशी पाऊले उचलावी लागणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.