सातारा वडूज येथून नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी कित्तूर येथे जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचा राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी नजीक अपघात होऊन 6 वर्षाचे एक बालक जागी ठार तर अन्य 5 जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत दुर्दैवी बालकाचे नांव सादिक साजिद मुल्ला (वय 6) वर्षे असे आहे. अपघातात कार गाडीतील सादिकचे अन्य कुटुंबीय जखमी झाले आहेत.
हे सर्वजण सातारा वडूज येथून नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी आज सकाळी कित्तूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी येथे त्यांच्या एस्टीम कारला अपघात झाला.
जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून अपघाताची यमकनमर्डी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.