ऑगष्ट महिन्याच्या पहिला रविवारी, तरुण पिढी मैत्री दिवस (Friendship day) म्हणून साजरा करते. द्वापारयुगामध्ये श्री कृष्ण आणि सुदामा , महाराजांच्या काळात संभाजीराजे व कवी कलश, पृथ्वीराज चौहान व कवी चंद्रवरदाई अशी मैत्रीची महान परंपरा या देशाला लाभली आहे.
आजच्या दिवशी तरुण उद्योजक शिवाजी नगर येथील रहिवाशी अभय बेळगुंदकर यांनी आपल्या मित्राला रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने मैत्री दिवस( friendship day) दिवस साजरा केला. मित्राला रक्ताची गरज आहे हे समजताच आपला व्यस्त व्यवसाय व friendship day चे सेलिब्रेशन बाजूला सारून लगबग येळ्ळूर के एल इस्पितळ गाठले व आपल्या मित्रासाठी रक्तदान केले. अशाप्रकारे कठीण प्रसंगी जो मदतीस धावतो तोच खरा मित्र ही म्हण त्यांनी खरी करून दाखवली.
जगात सर्वात श्रेष्ठ मदत किंवा दान जर कुठलं असेल तर ते रक्तदान आहे कुणालाही रक्तदान दिलेला माणूस आयुष्यात कधीच विसरू शकत नाही त्यासाठी रक्तदान करा हा संदेश देण्यासाठी आणि मैत्री जपण्यासाठी बेळगुंदकर यांनी आपण रक्तदान केले असल्याचे सांगितले.
आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले मात्र फ्रेंडशिप डे चा औचित्य साधून सामाजिक संदेश देणे मला महत्त्वाचे वाटले म्हणून मी रक्तदान केलं असे बेळगुंदकर यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले
आजची तरुणाई सोशल मीडियावर हजारो मित्र मैत्रिणी खिशात घेऊन फिरत असते पण गरजेच्या वेळी खरे मित्रच कामाला येतात. आज Freindship day दिवशी मोजकेच का होईना चांगले मित्र बनवा हा सल्ला तरुणाईला द्यावासा वाटतो. अभय बेळगुंदकरचा मैत्रिभाव खरोखरच प्रशंसनीय आहे व समाजासाठी एक उदाहरण देखील आहे.