जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जीतो संस्था, आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक यांच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन,
बेळगाव येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जितो फाउंडेशनच्या रक्तदान शिबिर समन्वयक अभय आदिमानी यांनी पत्रकार परिषदेत सदर महिती दिली.
यावेळी जीतो संस्थेचे अध्यक्ष पुष्पक हनमन्नावर हर्षवर्धन इंचल, अमित दोशी आदी उपस्थित होते.या शिबिरात केएलई ब्लड बँक, बीम्स ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, बेळगाव ब्लड बँक सहभागी होणार आहेत.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक लाख रुपयांची विमा पॉलिसी दिली जाणार आहे. एक युनिट रक्त तीन जीव वाचवू शकते. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी संपूर्ण भारत देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जितो संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिरात बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे त्यांनी सांगितले.