सिमेंटच्या जंगलात हिरवीगार झाडी लुप्त झाल्यामुळे आता ऐकावे ते नवलच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण नेमके जंगल कोणते आणि मानवी वस्ती कोणती हेच समजेनासे झाले आहे.कारण आता बिबट्या झाला,चक्क तरस चे आगमन मानवी वस्तीत झाले आहे.हो वाटते ना नवल मात्र हे खरंच आहे.
बेळगाव येथील भूतरामट्टी गावामध्ये चक्क सुसाट वेगाने धावणारे तरस आढळून आले आहे.यामुळे आता मानवी वस्तीत प्राणीच राहतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील आठवड्यात बिबट्याने बेळगाव शहरात आगमन केले. यानंतर चिकोडी तालुक्यातील मुडलगी येथे देखील बिबट्या शेळी फस्त करत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते.यामुळे नागरिक घाबरून गेले आहेत.
बिबट्या मिळण्याच्या आधीच आता तरस आढळून आले आहे.परिणामी अचानक आलेल्या हरिणामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. नेमके काय आहे,बिबट्या की काय असे म्हणत नागरिक चांगलेच घाबरले .मात्र तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्या मिळावा यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत असून सीसीटीव्ही तसेच ट्रॅक्टर कॅमेरा यांच्या माध्यमातून बिबट्यांची शोध मोहीम चालू आहे मात्र अजूनही बिबट्याचा शोध लागला नसून आता वनविभागाकडे दुसरे आवाहन निर्माण झाले आहे.भूतरामट्टी या गावातील मानवी वस्तीत तरस शिरल्यामुळे नेमके हे कोठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे