Thursday, December 19, 2024

/

शिवाजी विद्यापीठाच्या योजनेसाठी इतक्या जणांचे अर्ज

 belgaum

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी यावर्षी एक विशेष योजना राबवली आहे.सीमा भागातील वादग्रस्त 865 गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष योजना राबविली आहे पहिल्याच वर्षी कमी कालावधी उपलब्ध असताना सुद्धा विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे.

यासाठी महाराष्ट्र शासन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी शिर्के व त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत असे पत्रक मध्यवर्ती समितीने प्रसिद्धीस दिले आहे.यावर्षी 87 विद्यार्थ्यांचे एम.ए,एम.एस.सी,एम.कॉम,बीटेक,एमसीए, एमबीए इत्यादी पदवीत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्राप्त झाले असून शिवाजी विद्यापीठाने या सर्व 87 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे सीमा भागातील काही विद्यार्थी सध्या पदवीतर अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या वर्षीचे शिक्षण घेत आहेत. त्यांना सुद्धा या दुसऱ्या वर्षाच्या फी मध्ये वस्तीगृहाची पूर्ण सवलत देणे देण्यात आली आहे.

तसेच यापुढे सीमा भागातील विद्यार्थ्यांना पीएचडी साठी तीन वर्ष शिवाजी विद्यापीठामध्ये मोफत वसती गृह व वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने याबाबत सातत्याने पाठपुरा केला व बेळगाव निपाणी भालकी उदगीर येथे विद्यार्थी व पालकांच्या बैठका घेऊन विद्यापीठातील प्राध्यापकांना सहकार्य केले. तसेच यामध्ये निवृत्त अधिकारी दिनेश ओऊळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.