बेळगाव सह सिमाभागातील भगव्याच्या आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी ‘घर तिथे शिवसैनिक अभियान’ राबवण्याचा निर्णय तालुका शिवसेनेने घेतला आहे.
सिमाभागातील मराठी माणसाची होणारी कुचंबना यावर मात करण्यासाठी बेळगाव तालुक्यातील मराठ्यांनी एकत्रीत यावे. शिवसेनेचे गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत सुरु झालेले सदस्य नोंदणी अभियान शिवसैनिकांनी प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवावे, असे आवाहन पत्रकाद्वारे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी केले आहे.
मराठी आणि मराठ्याची ताकद आहे हे आजपर्यंत आपण विसरलेलो आहे आमच्या शांततेचा गैर फायदा घेऊन काही हिंदुत्वं पाजणाऱ्या ढोंगी लोकांना आमची एकी दाखवावीच लागेल. यासाठी सिमाभागात आता शिव सेना बळ्कट करून सदस्य नोंदणी करण्याची गरज आहे.
ज्या गोर-गरीबांचे प्रश्न सोडविता येतील त्या सर्वांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवावे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक मोहिम राबवून शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षाच्या कामाला लागावे. शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी माझे घर, माझी जबाबदारी हे अभियान सुरु केले. त्याचे परिणाम आता दिसू लागलेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय आपणांसर्वांना घराघरापर्यंत, गावागावापर्यंत पोहचवायचे आहेत. सिमाभागातील शेतकरी सुखी व्हावा, मराठी युवक व महिलाना तो योग्य मिळावा याकडे शिव सेनेचे लक्ष आहे. या साठी आपण सर्व जन मराठी जनता एकत्रीत नक्कीच येथील असा विश्वास गोरले यांनी व्यक्त करत येणाऱ्या प्रत्येक समाजकारण सोबत राजकारणात शिव सेना रिंगणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
*सभासद नोंदणी संपर्क*
लक्ष्मी मंगल कार्यालय बाजूला, बेळगाव तालुका शिव सेना संपर्क कार्यालय पिरानवाडी नाका, बेळगाव
मोबाईल क्रमांक
+918197664747
सचिन यांनी (तालुका प्रमुख, शिवसेना)
94800 53713
पिराजी शिंदे (उप तालुका प्रमुख, शिव सेना )
9742826827
#wheretheiris thereisShivsena