कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमोर असलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
असून काल शुक्रवारी 100 हून अधिक तर आज शनिवारी 80 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 370 हुन अधिक झाली आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळात सक्रिय रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
शनिवारी सापडलेल्या नवीन 80 कोरोना रुग्णात 20 रुग्ण बेळगाव तालुक्यात तर 22 रामदुर्ग आणि 17 बैलहोंगल मध्ये सापडले आहेत.
दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे बोम्मई यांनी बेंगलोर येथील आपल्या निवासस्थानी विश्रांती घेण्याचे पसंत केले आहे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची फोन करून आरोग्याची चौकशी केली.