नियंत्रण सुटलेल्या एका कॅन्टरने चन्नम्मा चौकातील राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे.
KA 23, 3581 क्रमांकाचे मालवाहू वाहन सिव्हिल इस्पितळाकडून राणी चन्नम्मा चौकाकडे वेगाने येत होते.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाची चौथऱ्याला जोराची धडक बसली. या घटनेत चौथऱ्याचे नुकसान झाले आहे.
वाहन इतक्या वेगाने आदळले की चौथऱ्याशेजारी असलेला संरक्षक कठडा उखडला आहे. या घटनेत कॅन्टर मधील क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कॅन्टरचा ब्रेक का लागला नाही वाहनचालक दारूच्या नशेत होता का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.