भारतीय निवडणूक आयोगाने वोटर आयडी आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरु केली असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये जनजागृती संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी माहिती दिली असून शनिवारपासून बेळगावमध्ये वोटर आयडी आणि आधार लिंक प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बेळगावात संवाद जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याहस्ते करण्यात आला. शहापूर कोरे गल्ली येथून या रॅलीची सुरुवात करण्यात आली.
हि लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आणि विनामूल्य ठेवण्यात आली असून कोणत्याही मतदारांना हे करण्यासाठी भाग पाडले जाणार नाही. मात्र मतदारांनी मतदार हेल्पलाइनच्या आधारे मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करावे, असे आवाहन तसेच यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शनिवारी जनजागृती संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या रॅलीच्या माध्यमातून १० हजार मतदारांचे आधार लिंक करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रुद्रेश घाळी यांनी सांगितले.
या रॅलीत मनपा उपायुक्ता भाग्यश्री हुग्गी, अभियंत्या मंजुश्री आदींसह इतर अधिकारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.