वृद्ध आणि दिव्यांग पर्यटकांच्या सोयीसाठी जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्स देणगी दाखल दिल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कांही वेळेला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींचाही समावेश असतो.
त्यांची चांगली सोय व्हावी त्यांना देखील इतरांप्रमाणे प्राणी संग्रहालयातील वातावरणाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली या प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्स देणगी दाखल दिल्या.
याप्रसंगी पशु वैद्यकीय अधिकारी नागेश हुईलगोळ, प्राणी संग्रहालयाचे देखभाल प्रमुख रायाप्पा, आदित्य जी., अद्वैत चव्हाण, नितीन कोठारी, आर्यन नलवडे, लकी सोळंकी, ध्रुव हंजी आदींसह जैन कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.