गुरुवारी सकाळपासून पावसाची संततदार सुरू असून परिणामी नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सर्वाधिक पावसाची नोंद होणारा खानापूर तालुक्यातील आला तरी नदीचा पूल पाण्याखाली गेला असून यामुळे खानापूर तालुक्यातील 35 गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.
प्रामुख्याने बुधवारी रात्रीपासून पावसाची संततदार चालू असून गुरुवारी तर सकाळपासून पावसाने अधिकच जोर धरला आहे.यामुळे अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या हेमाडगा राज्य मार्गावरील हालात्री नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम भागातील कणकुंबी, जांबोटी, आमगाव, चापोली, हेमाडगा या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.
खानापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मणतुर्गा नरसगे गावाजवळून वाहणाऱ्या हालात्री नदीवरील पुलावर आज सकाळी एक फूट पाणी पातळी होती. संतत धार तशीच राहिल्याने त्यानंतर पाणी पातळीत सातत्याने वाढ होऊन सकाळी दहाच्या सुमारास तीन फूट इतके पाणी चढले, माञ त्यामुळे धोका टाळण्यासाठी खानापूर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा रस्ता वाहतुकीला बंद केला होता. अखेर आला तरी नदीवरील पुलावरून पाणी गेले असून पूल पाण्याखाली गेल्यामुळे 35 गावांचा संपर्क तुटला आहे .
सध्या पुलावर दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले असून कोणत्याही प्रकारे जीवित हानी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.सध्या पुलावर दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मलप्रभा वाहतेय दुथडी
खानापूर तालुक्यात पावसाची संततधार कायम असून परिणामी मलप्रभा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध हब्बनट्टी चे मंदिर देखील पाण्याखाली गेले .मागील चार वर्षांपूर्वी मलप्रभा नदीला पूर आल्यामुळे येथील मलप्रभा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता.परिणामी संपूर्ण जीवन विस्कळीत झाले होते सातत्याने अशीच पावसाची संततधार राहिल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील हालात्री नदीचा पूल पाण्याखाली
35 गावांचा संपर्क तुटला@belgaumlive @DcBelagavi @BSBommai pic.twitter.com/gqZzH5ehOG— Belgaumlive (@belgaumlive) July 14, 2022