Wednesday, May 1, 2024

/

शहरातील ‘या’ वसाहती झाल्या जलमय; सर्वत्र पाणीच पाणी

 belgaum

सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना आता सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरूर लागले आहे. वडगाव परिसरातील अन्नपूर्णेश्वरीनगर आणि केशवनगर या वसाहतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी घराघरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडून हाल सुरू झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे अन्नपूर्णेश्वरीनगर आणि केशवनगर या वसाहतीमध्ये सध्या सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. महापालिकेकडून या वसाहतीमध्ये मदतकार्य हाती घेण्यात आले असून पाणी शिरलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे. त्याचप्रमाणे बहुमजली इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या नागरिकांची वरच्या मजल्यावरील ब्लॉक्समध्ये राहण्याची व्यवस्था केली जात आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास अन्नपूर्णेश्वरीनगर आणि केशवनगर या वसाहतीमध्ये पाणी शिरण्याचा हा प्रकार दरवर्षी घडत असतो. नागरिकांनी वारंवार अर्ज विनंती करूनही अन्नपूर्णेश्वरीनगर आणि केशवनगर समीप असलेल्या नाल्याच्या साफसफाईकडे  महापालिका प्रशासनाने केलेले साफ दुर्लक्ष यंदाच्या या पूर परिस्थितीला कारणीभूत ठरले आहे.Water loggin

 belgaum

दरम्यान खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे येथील रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन कर्नाटक -गोवा संपर्क तुटला आहे. कर्नाटकातून गोव्याकडे जाणारा हेम्माडगा राज्य महामार्गावरील अलात्री गावानजीकच्या पुलावर सुमारे चार फूट पाणी आले आहे. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

शेजारी महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचा कहर सुरूच असून पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. या नदीचा नरसिंहवाडी येथे कृष्णा नदीशी संगम होतो. त्यामुळे नरसिंहवाडी देवस्थान पूर्णपणे पाण्यात गेले आहे. कृष्णा नदी पात्रातून सध्या 1 लाख 19 हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा प्रवाह वाहत आहे. अलमट्टी जलाशयातून 1 लाख 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.