पावसाळा सुरू झाला की विविध साथीचे रोग डोके वर काढतात.साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी विविध संघ संस्था यांच्यातर्फे मोफत लसीकरणाचे आयोजन केले. असाच एक उपक्रम एकादशी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. शहरआणि ग्रामीण भागात भव्य प्रमाणात मोफत डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था बघायचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी देखील श्रीराम सेनेच्या शिबिराला हजेरी लावून लसीकरणाचा लाभ घेतला.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली , श्री श्रीकांत कुऱ्याळकर- बेळगाव महानगर अध्यक्ष, श्री रोहित जाभंळे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहर तसेच बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम पार पडला. मागील रविवारी श्रीराम सेना हिंदुस्तान ने बेळगाव दक्षिण भागामध्ये मेगा लसीकरण शिबिर आयोजित केले होते एकाच वेळी 30 ठिकाणी आयोजित केले होते त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
उत्स्फूर्त प्रतिसाद
मोफत डेंगु व चिकनगूनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिरात ” स्थानिक नागरिकांकडून उस्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. रविवारचा दिवस असल्यामुळे विविध व्यवसाय नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील लसीकरणाचा लाभ मिळाला. याबरोबरच लहान मुलांना देखील लसीकरण करण्यात आले.
बदलते हवामान त्याचबरोबर पावसाचे वाढते प्रमाण डासांचा प्रादुर्भाव यामुळे विविध आजार डोके वर काढत असतात परिणामी याला आळा घालण्यासाठी लसीकरण हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. यामुळें श्रीराम सेने तर्फे हा उपक्रम राबवून नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे चित्र या उपक्रमामुळे पाहायला मिळाले.
या ठिकाणी राबविण्यात आले शिबिर बेळगाव महानगरातील आणि तालुक्यातील शाहुनगर, सदाशिवनगर, नार्वेकर गल्ली, उचगाव, हिंडलगा, धामणे , विभागात प्रामुख्याने हे शिबिर राबवण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच शिबिराला हजेरी लावत लसीकरण करून घेतले.