belgaum

सांगोल्याजवळील अपघात बेळगावचे दोघे वारकरी ठार

0
19
Sangola accident
 belgaum

भेटी लागी जीवा ….आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या बेळगावच्या वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला असून विठ्ठलाची भेट व्हायच्या अगोदरचं त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला अनगोळ बेळगावचे पाच जण जात होते सांगोल्या जवळ त्यांची कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.जखमींवर पंढरपूर येथील लायलाईन इस्पितळात उपचार सुरू आहेत.

पंढरपूर सांगोला रोडवर कासेगाव फाट्याजवळपास मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कार पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे.पंढरपूर तहसीलदार कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात वरील माहिती देण्यात आली आहे.Sangola accident

 belgaum

राजू संभाजी शिंदोळकर वय 45 आणि परशराम संभाजी  झंगरुचे वय 50 दोघेही राहणार भांदूर गल्ली अनगोळ अशी या अपघातात मयत झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.तर अभिजित हुंदरे वय28, गीतेश कोकितकर वय 26 आणि राजू कृष्णा मजुकर वय 26 (वाहन चालक) सर्वजण रा. अनगोळ बेळगाव अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री टियागो कार मधून पाचही जण पंढरपूरकडे रवाना झाले होते मध्यरात्री दीडच्या सुमारास कार पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे यामुळे अनगोळ भागांतील विठ्ठल भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.