Saturday, November 23, 2024

/

कोसळलेले झाड हटवण्याकडे दिरंगाई; नागरिकांना मनस्ताप

 belgaum

बेळगाव वेंगुर्ला रोडवर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका आणि हिंडलगा ग्रामपंचायत यांच्या हद्दीच्या सीमेवर असलेल्या हिंडलगा, विजयनगरच्या कॉर्नरला काल रात्री एक मोठे झाड पावसामुळे उन्मळून पडल्याने आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी ते झाड हटविले. सदर झाड कॅन्टोन्मेंट हद्दीत असले तरी ते हटवण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या पडणाऱ्या संततधार पावसामुळे हिंडलगाव विजयनगर कॉर्नर महात्मा गांधी सर्कलनजीक रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडल्याची घटना काल रात्री घडली आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कोसळलेल्या या झाडामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तथापि सदर रस्त्यावरील वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला आहे. सदर झाड हे कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्यामुळे झाड कोसळल्याची माहिती देऊनही आज सकाळी 10 वाजेपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. परिणामी कोसळलेल्या झाडामुळे सदर मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. तथापि झाड प्रचंड मोठे असले तरी शेवटी नागरिकांनीच महत्प्रयासाने ते झाड थोडे बाजूला सरकवून किमान दुचाकी साठी रस्ता खुला करून दिला आहे.

रस्त्यावर उमळून पडलेले हे मोठे झाड हटवण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे झालेले दुर्लक्ष आणि बेळगाव महापालिका व हिंडलगा ग्रामपंचायतीने ती आपली हद्द नाही असे सांगून हात वर केल्यामुळे आज सकाळी 10 वाजेपर्यंत कोसळलेले ते झाड रस्त्यावरच पडून होते. त्यामुळे सदर रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना अन्य मार्गाने इच्छित स्थळी भोवाडा मारून जावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 10:30 वाजता कोसळलेले झाड रस्त्यावरून हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.Tree fell vengurla road

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अलीकडच्या काळात झाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र त्याची कॅन्टोन्मेंट बोर्ड करून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रार यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सीमा सय्यद यांनी केली. कॅन्टोन्मेंट हद्दीतील मोठी झाडे कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असतो. अलीकडेच क्लब रोड येथे अंगावर झाड कोसळल्याने एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता.

हे सर्व प्रकार घडत असले तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र या संदर्भात कोणती हालचाल करत नाही. खरंतर त्यांनी सर्वेक्षण करून जुनाट कोसळण्याच्या अवस्थेत असलेली झाडे हटवली पाहिजेत. मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही आहे. असे सांगून झाड कोसळून मृत्युमुखी पडणार यांना काही लाखांमध्ये नुकसान भरपाई देण्याऐवजी 1 कोटीच्या घरात नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तेंव्हाच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डोळे उघडतील असेही सीमा सय्यद यांनी खेदाने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.