Sunday, November 24, 2024

/

‘रामतीर्थनगरात घरफोडी’

 belgaum

घरात कुणीही नसलेले पाहून रामतीर्थ नगर येथील एका घरावर चोरट्यानी डल्ला मारत लाखो रुपयाचे दागिने आणि ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

2 जुलै रोजी रामतीर्थ नगर क्रिकेट स्टेडियम च्या बाजूला असलेल्या सतीश रणवरे यांच्या घरी चोरी झाली आहे शिक्षण खात्यात सेवा बजावणारे सतीश रणवरे रजेवर होते ते आपल्या कुटुंबासह धर्मस्थळाला देवदर्शनाला गेलेले होते.

यावेळी दोन जुलै रोजीच्या रात्री चोरांनी या गोष्टीचा फायदा घरचा दरवाजा आत प्रवेश केला आणि घरातील सात तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख 31 हजार किंमतीचे चांदी आणि रोख रक्कम चोरी करून फरारी झाले आहेत.

त्यांच्या घरच्या बाजूला रहाणाऱ्या शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची घटना त्यांना फोनवर कळवली सोमवारी सकाळी कुटुंबीय परंगावाहुन परतले असता त्यांनी माळ मारुती पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली.

माळ मारुती पोलीस स्थानक व्याप्तीमध्ये दरोडे चोऱ्या अश्या घटनांत वाढ होत असून पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.