श्रीराम सेना हिंदुस्थानचे समाजाशी रक्ताची नातं आहे हे परत एकदा सिद्ध झाले आहे आज श्रीराम सेनेच्या वतीने सुमारे 400हुन अधिक युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. हे मेगा रक्तदान शिबिर राबवत सेनेने विक्रम केलेला आहे.
वडगाव येथील सोनार गल्ली जवळील जिव्हेश्वर मंगल कार्यालयात श्रीरामसेनेच्या वतीने हे मेघा रक्तदान शिबिर घेण्यात आले.सकाळी 10:00 वाजल्यापासून ते दुपारी तीन पाच वाजेपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केले,56 वर्षाच्या मारुती जाधव पासून ते अठरा वर्षाच्या युवक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी उत्साहात रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन एक नवा आदर्श घालून दिला. श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेने मागील रविवारी देखील शहरात एकाच दिवशी 30 ठिकाणी चिकनगुनियांनी डेंगूच्या शिबिर घेऊन कामाचा धडाका सुरू केला होता त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी त्यांनी आपत्कालीन सेवा देखील हेल्पलाइन जाहीर केली होती. त्यानंतर आज हे रक्तदान करून त्यांनी समाजाशी आपण बांधील आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे.
श्रीराम सेना ही लढाऊ आणि कट्टर संघटना म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचं काम कधी नेत्रदीपक आणि आवाढव्य असते हे परत एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवले. आपण एक मोठं काम करू शकतो आणि असं काम करण्यासाठी माणसाला जिद्द, एकनिष्ठता आणि संघटन कौशल्य असावे लागते या सामाजिक बांधिलकीबरोबरच संघटना किती मजबूत आहे हे या उपक्रमाने परत एकदा समाजापुढे दिसून आलं., त्यामुळे सर्वत्र श्रीराम सेनेच्या या कार्याचे कौतुक होत आहे
सकल मराठा समाजाचा गुरुवंदना कार्यक्रम झाला त्या गुरुवंदना कार्यक्रमाची लीडरशिप रमाकांत कोंडुस्कर यांनी केली,त्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.पातळीवर सांमसुम असताना रमाकांत कोंडुसकरांचा हा धडाका एक वेगळीच एक वेगळी चुणूक दाखवून देत आहे. समाज कोणत्या दिशेला झुकत आहे, समाजाला काय हवंय आणि समाजाची नेमकी गरज काय या वर्मावर बोट ठेवून रमाकांत सध्या कामाचा धडाका उडवत आहेत.
सध्या अनेक ठिकाणी आपत्ती येतात, अपघात होतात, निरनिराळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात त्यासाठी रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आता हवा असतो. कोविड काळात रक्तदान शिबिरे थंडावली होती लोकांना अनेक व्याधी होत्या त्यामुळे रक्त संकलन कमी पडलं होतं.त्या पार्श्वभूमीवर आता हे सामाजिक काम जे केले गेले यातून खूप मोठा आधार रक्तपेढ्यांना मिळत आहे.त्याचबरोबर समाजासाठी जी आवश्यक बाब आहे ती या उपक्रमातन साध्य होत आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन अनेक ग्रामीण भागात किंवा इतर विभागात अशा पद्धतीचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, कारण आत्ता हा काळ सुदृढतेचा आहे नागरिक आता रोगराईतून बाहेर पडलेले आहेत.यावेळी असे उपक्रम राबवले गेले तर ते समाज हिताचे ठरेल.
एकंदर रमाकांत कोंडस्करांनी जे काम केले याबाबतीत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा एक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. रमाकांत कोंडस्करांचे संघटना उभा राहते. पूरग्रस्तांसाठी परवा दिवशी त्यांनी एक योजना आखली किंवा हेल्पलाइन चालू केली त्याचे लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून स्वागत केलं. अशा पद्धतीच्या समाज उपयोगी कामासाठी रमाकांत कोंडुस्कर आणि त्यांची श्रीराम सेना तत्पर राहते या यामुळे समाजात एक आगळा आदर्श निर्माण झाला आहे.याशिवाय रमाकांत कोंडुस्कर समाजासाठी लढणारे नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहे.