बेळगाव शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव महापालिकेने आता पाऊल उचलले असून मोकाट जनावरे प्रतिबंधक पथकाची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या पथकाच्या माध्यमातून शहरातील भटकी कुत्री, मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त केला जाणार आहे.
मोकाट भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात चार पथके स्थापन केली जाणार आहेत. या प्रत्येक पथकात आठ कर्मचाऱ्यांचा समावेश असणार असून शहरातील 58 प्रभागांची जबाबदारी या पथकांवर असेल.
कोणत्या पथकाकडे कोणत्या प्रभागाची जबाबदारी द्यावयाची हे लवकरच निश्चित केले जाणार आहे. शहरवासीयांना या पथकांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. त्यामुळे येत्या कांही दिवसात महापालिकेकडून प्रथम आज नियोजनबद्धरित्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाणार आहे.
भटक्या मोकाट जनावरांच्या विरोधातील मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. ‘केअर फोर व्हॉइसलेस’ या संस्थेकडे या नसबंदी मोहिमेचा ठेका देण्यात आला आहे या संस्थेचे चार कर्मचारी बेळगाव दाखल झाले असून नसबंदी शस्त्रक्रियेसाठी तीन डॉक्टर ही तैनात करण्यात आले आहेत.
येत्या दोन दिवसात भटक्या कुत्र्यांवरील नसबंदी शस्त्रक्रिया मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे समजते नसबंदी शस्त्रक्रिया होण्याआधी व त्यानंतर ही मोकाट कुत्र्यांना ठेवण्यासाठी पिंजरे आवश्यक असतात ते पिंजरे ही महापालिकेने खरेदी केले आहेत
बेळगाव शहरांमध्ये सुमारे 6000 मोकाट कुत्री असून यांचा बंदोबस्त महापालिका कशा पद्धतीने करणार हे आता पहावे लागणार आहे.