खानापूर कोर्ट कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेकण्यात येणारा केरकचरा आणि टाकाऊ साहित्य हटवण्याबरोबरच या प्रकाराला आळा घालून संबंधित जागेचा कायापालट केला जावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली खानापुरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
यावेळी बोलताना डॉ. सरनोबत यांनी खानापूर कोर्ट कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केरकचरा, घाण, टाकाऊ साहित्य फेकण्याचा गैरप्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे.
परिणामी या ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण पसरलेले असते. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. तेंव्हा याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे आणि तातडीने सदर रस्त्याची साफसफाई करून तेथील जागेचा कायापालट करावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी डॉ सोनाली सरनोबत यांच्या समवेत हलकर्णी गांधीनगर ग्रा. पं. अध्यक्ष परशराम पाटील, प्रवीण अग्नोजी, रवी मादर, पुट्टू हावनूर, मयूर हावनूर, ॲड. नागराज, ॲड. शशिकुमार, अनिल कुमार आदी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यातील ही समस्या सोडवा अशी मागणी डॉ सोनाली सरनोबत यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली@DcBelagavi @drsonalisameer pic.twitter.com/0eUIQbxGAb
— Belgaumlive (@belgaumlive) July 26, 2022