पावसाळ्यात प्रामुख्याने घर पडण्याच्या तसेच वीज पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात . शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्प विंचू तसेच इतर किटके चावण्याच्या घटना देखील घडतात.त्यामुळे पावसाची संततधार सुरू झाली की ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या जिवापेक्षा देखील पशुधनाची काळजी लागून राहते.कारण पावसामुळे पशूंची काळजी घेताना मोठी कसरत लागते.
बेनकनहळी गावातील दीपक नारायण चौगुले यांची म्हैस आज सर्पदंशाने दगावली असून शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने पशुधन जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात प्रामुख्याने जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरणे ओल येणे असे प्रकार घडतात यामुळे जनावरांना जपताना मोठी कसरत करावी लागते.शिवाय जनावरांना चारा तसेच गवत आणताना समस्या येतात यामुळे शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेत स्वतःची व आपली स्वतःची व पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे दीपक चौगुले यांची महेश सरपंच शाळेत दगावली असून असा प्रकार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.