बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे येत्या बुधवार दि. 24 ते रविवार दि 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत दररोज दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर रोडवरील गोवावेस रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिरामध्ये सलग पाच दिवस आयोजित ही संगीत भजन स्पर्धा बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुका आणि चंदगड तालुका या विभागांसाठी मर्यादित आहे.
पुरुष आणि महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेत नांव नोंदणीची अंतिम तारीख रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 ही असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वाचनालयाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव व मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे.