आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या बेळगाव सह सीमाभाग आणि उत्तर कर्नाटकातील वारकरी व विठूरायाच्या भक्तांना आनंदची बातमी असून बेळगाव पंढरपूर दोन दिवस विशेष रेल्वे सेवा देण्याची घोषणा दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने केली आहे.
बेळगावातील सिटीजन कौन्सिल या सामाजिक संस्थेने आषाढी वारीनिमित्त स्पेशल रेल्वे सेवा द्या अशी मागणी दक्षिण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे कडे केली होती. या मागणीची दखल घेत दक्षिण पश्चिम रेल्वेने शनिवार 9 आणि रविवारी 10 जुलै रोजी या गाडी वारी स्पेशल रेल्वे सेवांची सोय केली आहे
आषाढी एकादशी निमित्त बेळगाव सीमा भागातून लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात हजारो जण तर पायी दिंडी देखील चालत जात असतात मात्र रेल्वे द्वारे बेळगाव ते मिरज वाया पंढरपूर असा प्रवास रेल्वे द्वारे करावा लागत होता त्यासाठी रेल्वे खात्याने आता बेळगाव ते थेट पंढरपूर सलग दोन दिवस थेट पंढरपूर रेल्वे सेवा सुरू केली आहे.
शनिवारी आणि रविवारी सकाळी 9:45 वाजता बेळगाव हूंन पंढरपूरला थेट रेल्वे सेवा असणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेने मिरजहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेची सोय केलेली आहे त्यामुळे बेळगाव सह उत्तर कर्नाटकातून जाणाऱ्या वारकरी बेळगाव मधून कोणत्याही रेल्वे गाडीने मिरज पर्यंत जाऊ शकतात आणि मिरज नंतर त्यांना त्या चार ज्यादा रेल्वे देखील उपलब्ध असणार आहेत.
दक्षिण पश्चिम रेल्वेने शनिवार आणि रविवारी ज्या दोन विशेष रेल्वे सेवा ची सोय केलेली आहे त्या रेल्वेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहेत
पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय -सिटीझन्स कौन्सिल