Sunday, December 29, 2024

/

चंद्रशेखर गुरुजींच्या हत्त्ये प्रकरणी संशयितांना रामदुर्ग मधून अटक

 belgaum

सरळ वास्तुचे चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी मध्ये मंगळवारी दुपारी हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग मधून दोघांना सिनेमा स्टाईलने मोबाईल ट्रेस करत पोलिसांनी अटक केली आहे.

रामदुर्ग येथील महंतेश शिरूर आणि कलघटगीचा मंजुनाथ दुमवाड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करून ते कारमधून दोघेही फरारी झाले होते त्यांना सापळा रचून पकडताना पोलिसांनी रस्त्याच्या मध्ये जेसीबी लावून अडवून अटक केली आहे.

रामदुर्ग डीएसपी रामनगौडा हट्टी आणि पोलीस निरीक्षक पट्टणशेट्टी आणि पी एस आय शिवानंद कारजोळ यांनी संशयित आरोपीवर कारवाई करत ताब्यात घेतले. हुबळीत खून करून झालेल्या या संशयित आरोपींना फोन लोकेशन द्वारे पोलिसांनी पकडून हुबळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.Hubli guruji murder

दरम्यान गोकुळ रोड हुबळी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी एक महिला वनजाक्षी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.गुरुजींच्या खून प्रकरणी त्याच्या नातलगाचा सहभाग असण्याची आणि बेनामी संपत्तीच्या कारणावरून हत्त्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी दुपारी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी इथल्या अनेकल जवळील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.