Sunday, December 29, 2024

/

रोट्रॅक्ट क्लब बेळगावचा अधिकारग्रहण उत्साहात

 belgaum

रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.

शहरातील हॉटेल सेंटोरिनी येथे पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रमुख (डीआरआर) रो. अंकित जाधव उपस्थित होते. याप्रसंगी रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावच्या 2022-23 सालासाठी नूतन अध्यक्ष म्हणून जानवी भद्रा, सेक्रेटरी प्रेरणा जांभळे आणि खजिनदार कृष्णा अग्रवाल यांच्यासह अन्य नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची शपथ देऊन अधिकार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, सेक्रेटरी अक्षय कुलकर्णी आणि युवजन सेवा संचालक मनीष हेरेकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.Rotract club

आपल्या समयोचित भाषणात जयदीप सिद्दण्णावर यांनी रोट्रॅक्टच्या नूतन अध्यक्ष व संचालकांनी समाजाच्या हिताचे आणि विकासाचे प्रकल्प राबवावेत. तसेच युवा पिढीला रोटरॅक्टच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

झेडआरआर निखिल चिंडक यांच्यासह रोट्रॅक्ट क्लबचे अन्य जिल्हास्तरीय अधिकारी या अधिकार तसेच रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य व निमंत्रित अधिकार ग्रहण समारंभाला हजर होते. रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावची 50 वर्षांची समृद्ध कारकीर्द असून सदर क्लबने या कालावधीत अनेक डीआरआर निर्माण केले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.