Thursday, November 28, 2024

/

‘हा’ मोर जीवदानाच्या प्रतीक्षेत; पक्षीप्रेमी, वनखात्याने द्यावे लक्ष

 belgaum

हिंदवाडी येथील लिंगायत स्मशानभूमी परिसरात मुक्त विहार करणाऱ्या मोराच्या जीवाला मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला असल्यामुळे त्याला तात्काळ सुरक्षित स्थळी हलवून जीवदान द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

बेळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणी मोरांचे वास्तव्य आहे. संबंधित परिसरात अनेकवेळा हे मोर मुक्त विहार करताना नागरिकांना पहावयास मिळतात. याच पद्धतीने हिंदवाडी येथील लिंगायत स्मशानभूमीमध्येही मोराचे वास्तव्य आहे.

पूर्वी या ठिकाणी एकूण तीन मोर मुक्त विहार करताना पहावयास मिळत होते. मात्र अलीकडच्या काळात मोकाट कुत्र्यांनी यापैकी दोन मोरांचा फडशा वाढल्यामुळे ते नाहीसे झाले. परिणामी सध्या एकच मोर या लिंगायत स्मशानभूमी परिसरात वावरत असतो.Peacock

सदर परिसरात शिल्लक असलेल्या या एकमेव मोराला देखील मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. त्या मोराला आपले भक्ष्य बनविण्यासाठी ही कुत्री त्याच्या मागे लागत असतात. त्यामुळे सुरक्षित जागा गाठण्यासाठी तो मोर जीवाच्या आकांताने धावाधाव करत असल्याचे पहावयास मिळते.

तरी मोकाट कुत्र्यांनी त्या बिचार्‍या मोराचा जीव घेण्याआधी पक्षीप्रेमींसह विशेष करून वनखात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीतील त्या एकमेव मोराला तात्काळ पकडून प्राणी -पक्षी संग्रहालया सारख्या सुरक्षित ठिकाणी अथवा नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.