Monday, December 23, 2024

/

राव युवा अकॅडमीचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

 belgaum

बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या घटक असलेल्या काकती येथील राव युवा अकॅडमीच्या तायक्वांदो क्रीडापटुंनी बेंगलोर येथील अशोका कन्वेंशन हॉलमध्ये गेल्या 2 व 3 जुलैला वर्ल्ड टायकोंडो फेडरेशनचे नियमानुसार झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर, कॅडेट, ज्युनियर व सिनियर तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याची शान वाढविली आहे.

विफा तायक्वांडो इंडिया आणि एओटी इंडिया यांचे संयुक्त आश्रयाखाली झालेल्या उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धेत वेदांत खडबडीने पुमसेमध्ये रौप्य पदक तर क्योरुगीमध्ये सुवर्ण पदक, मोहम्मदशोहेब लतीफशहा चांदशहाने पुमसेमध्ये सुवर्ण पदक तर क्योरुगीमध्ये सुवर्ण पदक, धैर्य जयंतीलाल पटेल याने पुमसेमध्ये रौप्य पदक तर क्योरुगीमध्ये कांस्य पदक, मोहम्मदशफी लतीफशहा चांदशहा याने पुमसेमध्ये रौप्य पदक तर क्योरुगीमध्ये कांस्य पदक, गगन प्रेम शिवपुजीमठ याने पुमसेमध्ये रौप्य पदक तर

क्योरुगीमध्ये कांस्य पदक, जाफरसादिक बाबू पाचापुरे याने पुमसे व क्योरुगी दोहोत रौप्य पदक, पवनराज बसवराज दड्डीकर याने पुमसेमध्ये सुवर्ण पदक तर क्योरुगीमध्ये कांस्य पदक, सिद्धार्थगौडा विरंगौडा गौरी याने पुमसेमध्ये रौप्य पदक तर क्योरुगीमध्ये सुवर्ण पदक, आरुष अभय टूमरी याने पुमसे व क्योरुगी दोहोतही रौप्य पदक,

सानवी सागर पाटील हिने पुमसे आणि क्योरुगी दोहोत सुवर्ण पदक, जिया सतीश पुजारी हिने पुमसेमध्ये रौप्य पदक, कोमल दत्तात्रेय बेटेगिरी हिने पुमसे व क्योरुगी दोहोत ही रौप्य पदक, श्रेया मारुती अतिवाडकर हिने पुमसेमध्ये रौप्य पदक तर क्योरुगीमध्ये सुवर्ण पदक, त्रिवेणी बावकांना बडकनवर हिने पुमसेमध्ये रौप्य पदक, श्रीराज राजेश पाटीलने पुमसेमध्ये सुवर्ण पदक तर क्योरुगीमध्ये रौप्य पदक, जितेश सतीश पुजारी याने पुमसेमध्ये रौप्य पदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी बजावली. या सर्वांनी एकूण 9 सुवर्ण, 16 रौप्य आणि 4 कांस्य पदकं हस्तगत केली.

सदर स्पर्धेत केरळा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटका, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिषा, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, वेस्ट बंगाल, बिहार आणि न्यू दिल्ली येथून 1600 हून अधिक खेळाडुंनी भाग घेतला होता. राष्ट्रीय तायक्वांदो पंच स्वप्निल राजाराम पाटील व वैभव राजेश पाटील यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांचे प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभत आणि काकतीच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे प्रोत्साहन लाभत आहे. राव युवा अकॅडमीच्या यशाबद्दल बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर शेडबाळे आणि सचिव महादेव मुतनाळे यांनी हर्ष व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.