‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा यांच्या सहकार्याने राणी पार्वती देवी महाविद्यालय, बेळगाव तसेच कर्नाटक राज्य विश्वविद्यालय कॉलेज हिंदी प्राध्यापक संघ बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य में राष्ट्रीयता की भावना” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
२० जुलै रोजी आरपीडी महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहामध्ये सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून केंद्रीय शिक्षण मंडळाचे आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे उपाध्यक्ष अनिल जोशी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय हिंदी संस्थान आग्राच्या डायरेक्टर प्रो. बीना शर्मा उपस्थित राहणार आहेत. त्यांचे बीजवक्तव्य होणार आहे.
अतिथी म्हणून भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या राज्यभाषा विभागाचे सेवानिवृत्त क्षेत्रीय सहाय्यक डायरेक्टर (मुंबई) डॉ. जयशंकर यादव, डीआरडीओ बेंगळूरचे वरिष्ठ वैज्ञानिक राजू डी. नवींदगी उपस्थित राहणार आहेत. माजी प्राचार्या अरुणा नाईक व्याख्यान सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
आर पी डी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख व रानी चन्नम्मा विश्वविद्यालय कॉलेज हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र पोवार संयोजक आहेत. देशभरातून हिंदी विषयाचे प्राध्यापक व विद्वान उपस्थित राहून आपले विचार मांडनार असून याचा लाभ हिंदी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच इतरांनी घ्यावा, असे आवाहन आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी केले
आहे.