उंच उंच इमारतीमध्ये या इमारतीवरून त्या इमारतीवर उडी मारताना एका वानराचा मृत्यू झाला. वडगाव येथील भंडारी यांच्या गच्चीवर झेप घेत असताना डोक्याला मार लागून ते वानर मृत्युमुखी पडले आजूबाजूच्या लोकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ संबंधित भागाच्या लोकप्रतिनिधी शिल्पा कुंभार यांना कळविले .त्यांनी सहकाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन वानराचे अंत्यविधी करण्याबाबतच्या सूचना केल्या.
इतक्यात समाजसेवेत कार्यरत असलेले तसेच वार्ड नंबर 28नगरसेवक संजय पाटील यांना ही बाब समजली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहिली .ते पाहता या गच्चीवरून त्या गच्चीवर जाताना वानर मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शिडीचा वापर करून त्या वानराला खाली काढले.
हिंदू रिवाजाप्रमाणे त्याच्यावर संजय पाटील,राजू शिगोली व मलेश संकन्नवर यानी वडगाव येथे अंत्यसंस्कार केले.आजच्या सिमेंटच्या जंगलामध्ये पक्षी प्राण्यांना मोकळा श्वास घेताना संकटे येत आहेत झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्राणी पक्षी शहराकडे वळू लागली आहेत यामुळे याची दखल घेत संबंधित प्राण्यांना प्राणी संग्रहालयात दाखल करावे नाहीतर अशा घटनांमुळे प्राण्यांची संख्या घटू शकते असे यावेळी बोलताना संजय पाटील यांनी सांगितले.
इमारतींची संख्या अधिक असल्यामुळे एखादी वानर एखाद्या गल्लीमध्ये घुसले की या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारण्यास सुरू करते जंगल भागात काही खायला मिळत नसल्यामुळे ही वानरे शहराकडे वळू लागली आहेत मात्र शहरात असलेल्या उंच इमारती आणि विद्युत तारा यामुळे वानरांचा हकनाक बळी जात असून प्रशासनाने याची दखल घेऊन सदर मूक प्राण्यांसाठी योजना आखणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.