Thursday, May 16, 2024

/

गोल्ड बॉंड विक्रीत बेळगाव पोस्ट विभाग देशात अव्वल

 belgaum

गोल्ड बॉंड विक्रीत बेळगाव पोस्ट विभाग देशात अव्वल ठरला असून 3.53 कोटी रुपयांचे गोल्ड बॉंड विक्री करून बेळगाव विभागाने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पोस्ट खात्याची विश्वासार्हता व सुरक्षित गुंतवणूक यामुळे बेळगाव विभागात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक केली आहे. स्वाॅवरीन गोल्ड बॉंड योजना 20 ते 24 जून दरम्यान सुरू करण्यात आली होती.

बेळगाव पोस्ट विभागात बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, कित्तूर व रामदुर्ग या तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये एकूण 6,941 ग्रॅम स्वाॅवरीन गोल्ड बॉंडची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा बेळगाव येथील मुख्य पोस्ट कार्यालयाचा आहे. या कार्यालयातून 2 किलो सोन्याच्या किमतीचे बॉंड विक्री झाले आहेत.

 belgaum

स्वाॅवरीन गोल्ड बॉंडमध्ये एक ग्रॅम आजच्या सोन्याच्या किमतीनुसार गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला त्यावेळी असणाऱ्या सोन्याच्या किमतीनुसार सोने किंवा पैसे दिले जातात.

विश्वासामुळे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणुकीसाठी ही उत्तम योजना आहे. पोस्ट कार्यालयावर असणाऱ्या विश्वासामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात यात गुंतवणूक करत आहेत. बेळगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केल्यामुळेच बेळगाव विभाग देशात अव्वल ठरल्याचे पोस्ट खात्याचे अधीक्षक विजय नरसिंह यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.