Tuesday, May 28, 2024

/

महाराष्ट्राच्या नूतन मुख्यमंत्र्यांचे विशेष पत्राद्वारे अभिनंदन

 belgaum

महाराष्ट्राच्या नूतन मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने विशेष पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. सीमा लढ्यासाठी आपण प्रसंगी जेलमध्ये गेला आहात. आपल्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्न लवकर सुटेल अशी आम्हा सीमावासीयांना आशा आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला लवकरात लवकर सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा ही आपणास नम्र विनंती, असा तपशील महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या अभिनंदनपर विशेष पत्रात नमूद आहे.Eknath shinde

 belgaum

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांच्याकडे बेळगाव सीमा समन्वयक मंत्र्याचा देखील कार्यभार होता. आता या सीमा समन्वयक मंत्र्यांची थेट मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी बेळगाव सीमाप्रश्न आणि बेळगावच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग दर्शवला होता.

1986 साली बेळगावात झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनात त्यांनी धारवाडच्या तुरुंगात दोन महिन्याचा कारावास देखील भोगला आहे. आता त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे सीमाप्रश्न सुटण्याच्या दृष्टीने सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.