वेळ आणि काळ कधी सांगून येत नाही मात्र तो नशीबवान म्हणायचा….. कोणत्याही कामात हिरीरीने भाग घेणं आणि जमेल तेवढी जबाबदारी उचलणारा आणि काम तडीला नेणारा मदतनीस………याच सेवावृत्तीमुळे तो प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनला होता. मात्र काळाने गाठले आणि ऐन तारुण्यात त्याला अंथरूण धरावे लागले.हो ही घटना बेभान तारुण्य अनुभवणाऱ्या जबाबदार किसन पाटील ची आहे.
काही वर्षापुर्वी तो अशाच एका कामानिमित्त गावी गेला असताना, त्याची वाटमारी करणाऱ्या काळाने बेसावध असणाऱ्या किसनवर झडप घातली.आणि तो मोटर सायकल वरून घाली पडला आणि त्यात त्याची कंबर निकामी झाली. त्याचे वडील गावडू पाटील यांनी बेळगाव परिसरातील सर्व दवाखाने संपविले. पाण्यासारखा पैसा खर्च केला पण उपयोग झाला नाही.परिस्थिती समोर गुडघे टेकण्याची वृत्ती नसल्याने किसन अंथरूणावर पडून आपल्या जगण्याचा मार्ग शोधतो आहे.
सध्या मोबाईल हे हातातील खेळणं झाले आहे
याचाच उपयोग करत किशन जरी तो घरी अंथरूणावर पडून राहिला तरी मोबाईलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण फोटो एडीट करून अनेकांची मने जिंकली आहेत.कोणतही ट्रेनिंग नसताना देखील किसन त्यात तज्ञ आहे. यामुळे प्रत्यक्षात कोणाचाही संबंध नसलेला किसन अनेकांचा चाहता आहे आणि अनेकजण त्यांचे चाहते आहेत.
मदतीची गरज
जगण्याचा आणि जगण्याशी संघर्ष करणाऱ्या किसनला मदतीची गरज आहे पण तो कधीच कुणी आपल्याला काही द्यावं म्हणून अपेक्षा ठेवत नाही.अशा प्रतीक्षेत असलेल्या किसनची समाज सेविका डॉ सोनाली सरनोबत यांनी भेट घेतली आणि गहिवरून गेल्या.किसनची आई त्याची उत्तम देखभाल करतात.या किसनला आज गरज आहे ती मदतीच्या हातांची आणि भावनिक आधाराची. डॉ सोनाली सरनोबत यांनी त्याची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला
भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी किसन याला वर्षाला आर्थिक मदत देण्याचे सांगुन इतर मदत लागल्यास संपर्क करण्याचे सांगितले. तसेच आवश्यक गोळ्या औषधे उपलब्ध करून देणार आहेत.
मदत करायची असल्यास…
किसन पाटील यास मदत करायची असल्यास 9449751242 या क्रमांकाशी अथवा या 7498474067 या व्हॉटसआपशी संपर्क साधावा. तसेच मदत द्यायची असल्यास एसबीआय च्या खानापूर शाखेतील लक्ष्मी गावडा पाटील यांच्या खाते क्र.31740863511 मध्ये आयएफसी कोड SBlNOOO1001 येथे जमा करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.