मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या आरोग्य मदत कक्षा द्वारे शेकडो रुग्णांची मदत करणारे मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
चिवटे यांनी 2014 साली युती सरकार अस्तित्वात असते वेळी टी व्ही पत्रकारिता सोडून मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला त्यानंतर 2017 पासून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य मदत कक्षाची सुरुवात केली. मंगेश यांनी यापूर्वी ए बी पी माझा,न्युज 18 लोकमत,साम आणि जय महाराष्ट्र या वृत्त वाहिन्यातून काम केलं आहे.
पूर्वी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांनी तात्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा’ची संकल्पना अमलात आणली आणि त्याद्वारे हजारो रुग्णांना मदत मिळाली. त्यानंतर चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून हजारो रुग्णांना आरोग्य मदत कक्षा द्वारे मदत करत आहे त्यामुळेच मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदेंचे एकदम जवळचे आणि विश्वासाचे सहकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विशेष अधिकारी पदी (ओएसडी) म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.
बेळगावचा महाराष्ट्रात समावेश झाला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये सीमा प्रश्नी मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी तळमळ असलेले मंगेश चिवटे अनेकदा बेळगावला येत असतात. मुख्यमंत्र्याचे ओएसडी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने बेळगाव प्रश्नी यांची मदत होणार आहे.दरवर्षी एक नोव्हेंबर काळा दिनाला आणि 17 जानेवारी हुतात्मा दिनाला त्यांची हजेरी असते.
अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय मुंबईत आणण्यासाठी दिल्लीमध्ये बेळगावच्या युवकांनी पाठपुरावा केला त्यावेळी देखील मंगेश यांनी स्वतः जातीने दिल्लीत हजेरी लावत भाषिक अल्पसंसंख्या कार्यालयासाठी प्रयत्न केले होते मंगेश चिवटे मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या सतत संपर्कात असतात.
मुख्यमंत्री कार्यालयातील सात विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाचे आवर सचिव दे सा भंगुरे यांनी केली आहे त्यात मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.