दर रविवारी भरणाऱ्या बसवेश्वर चौक खासबाग येथील आठवडी बाजारात भुरट्या चोऱ्यांना ऊत आला आहे. या बाजारात दर रविवारी खरेदीसाठी बेळगाव शहर परिसर तालुका ग्रामीण भागातून आठवड्यातला घरचा बाजार आणण्यासाठी कडधान्य भाजीपाला किंवा इतर कोणतीही सामग्री आणण्यासाठी लोक येत असतात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या बाजारात नेहमीच खरेदीसाठी गर्दी असते या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर अनेक चोऱ्या करत आहेत.
अशा भुरट्या चोरांवर पोलिसांनी अंकुश ठेवून त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे. वडगांव खासबाग शहापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात राहणारे लोक सुट्टीच्या निमित्ताने भाजीपाला किंवा इतर महत्त्वाची सामग्री घरात लागणारा बाजार खरेदी करण्यासाठी या बाजारात गर्दी करत असतात. खरेदीसाठी येत असतात.
रविवारी सकाळच्या सत्रात तर या ठिकाणी मोठी गर्दी असते. या ठिकाणी महिलांची पुरुषांची पर्स मारणे किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करणे असे प्रकार वाढू लागले आहेत या ठिकाणी शहापूर पोलिसांनी काही प्रमाणात वेळे पुरता बंदोबस्त देखील दिला होता मात्र पोलिसांच्या डोळ्यात मिरची टाकत हे चोर भुरट्या चोऱ्या करत आहेत.
आठवडी बाजारात खरेदीसाठी गेलेल्या वर्षा कुकडोळकर यांचा पर्स चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली.त्यांच्या पर्स मध्ये केवळ 600 रु. रोख होते अशा प्रकारच्या अनेक लहान-सहान चोऱ्या या ठिकाणी घडत आहेत त्यावर पोलिसांनी नियंत्रण आणावे अशी मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.
बाजारात च्या वेळी पोलीस बंदोबस्तासाठी काही वेळ थांबत असतात मात्र आणि निघून जात असतात त्यामुळे कायमस्वरूपी पोलीस नेमल्यास या ठिकाणी चोरट्यावर नियंत्रण ठेवता येईल असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.
बिरणवाडी येथील आठवडा बाजारात देखील अशाच पद्धतीच्या महिलांच्या पर्स आणि मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे एकूण परिसरातल्या बाजारावर चोरट्यांनी लक्ष केले असून पोलिसांनी बाजार परिसरावरच बंदोबस्त वाढवावा अशी मागणी वाढू लागली आहे.