शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केट आता पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या मंगळवार दि. 2 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.
कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष जय किसान होलसेल भाजी मार्केट फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्यात येत होते. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव निवळल्यामुळे पूर्वीप्रमाणेच सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत अशा दिवसाच्या दोन सत्रात हे भाजी मार्केट सुरू ठेवण्यात येणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांसह व्यापारीवर्गाची देखील चांगली सोय होणार असल्यामुळे संबंधितांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.