हिंडलगा येथील ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे.त्यावर मयत संतोष पाटील यांच्या पत्नी रेणुका पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ईश्वराप्पा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करूनआपल्याला हवा तसा तपास करवून घेत स्वतःला या प्रकरणातून क्लिन चिट मिळवून घेतली आहे असा आरोप केला आहे.
बेळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.गेल्या 15 दिवसांपूर्वी बागलकोट मध्ये आपण 15 दिवसांत या आरोपातून मुक्त होणार असे वक्तव्य केले होते त्यावेळी मी राज्यपालांना पत्र लिहिले होते.तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशीही केली नाही कोणत्या पुराव्यावर त्यांना निर्दोष केले असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
माझ्या पतीने ग्रामीण भागात 108 कामे पूर्ण केली आहेत त्याची चौकशी झाली नाही जिल्हा पंचायत,जिल्हा प्रशासन का गप्प बसले असा प्रश्न करत सुसाईड नोट लिहुन माझ्या पतीने आत्महत्या केली होती मग आरोप निर्दोष कसा काय असू शकतो.क्लिन चिट दिल्या विरोधात आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय.
ईश्वरप्पा यांनी 40℅ कमिशन मागितलं माझ्या नवऱ्यावर अन्याय झालाय त्यांनी स्वतः डेथ नोट लिहुन आत्महत्या केल्याची देखील त्यांनी म्हटलं आहे