पुन्हा एकदा बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील ॲक्शन मध्ये आले असून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील चिखले येथील धबधब्यावर वनखात्याकडून वसुली करण्यास ब्रेक लावण्यात आला आहे.
वनखात्याकडून विकासाच्या नावाखाली प्रत्येक पर्यटकाकडून एंट्री फी म्हणून 290 वसुली करण्यात येत होती. बेळगाव लाईव्ह सह अनेक माध्यमांनी या वसुली विरुद्ध आवाज उठवला होता .आणि या बाबतच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या सदर आर्थिक भुर्दंड बसणाऱ्या अवैधरित्या सुरू असणाऱ्या वसुलीला ब्रेक लावला आहे
बेळगाव येथील सुवर्णसौध मध्ये माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी माहिती देत वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी बैठक करून चिखले धबधब्यामध्ये पर्यटकाकडून अवैधरित्या पैसे वसुली करू नका असा सूचना दिल्या आहेत.
विकासाच्या नावाखाली पर्यटकांकडून घेण्यात येणारे अधिक पैसे हे पर्यटकांसाठी आर्थिक भूवदंड ठरणारे असून सदर पैसे वसुली तात्काळ थांबवावी असे स्पष्ट केले शिवाय आता पैसे वसुली करण्यास थांबवण्यात आल्याचे देखील जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केला.
पावसाळ्यामध्ये चिखले धबधबा पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक जात असतात अशावेळी अशा पर्यटकाकडून विकासाच्या नावाखाली 290 फी घेणे चुकीचे आहे याबाबत माध्यमानी आवाज उठवताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पर्यटकांच्या सुविधासाठी राज्य सरकारने अनेक योजना करण्याची योजनेबाबत चिंतन सुरू असल्याचे देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या चिखले धबधब्यावरील अवैध वसुली बाबत बेळगाव लाईव्ह ने देखील वृत्त प्रसारित केले होते त्या वृत्ताची लिंक खालील प्रमाणे आहे.