आर्थिक परिस्थिती बेताची , एका छोट्याशा कंपनीमध्ये काम
अशा परिस्थितीतआरोग्याने साथ सोडली. आणि बडिगेर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला.ब्रेन हॅमरेज आणि एका बाजूला पॅरलेस अशा अवस्थेत के. एल. इ. इस्पितळात दाखल करत तात्काळ ऑपरेशन करण्यात आले.
मात्र सध्या त्यासाठी लागलेला खर्च आणि पुढील उपचारासाठी आवश्यक खर्च याचा ताळमेळ करताना संकटाचा सामना करावा लागत असून या कुटुंबाला मदतीची गरज आहे.
सुरेश बडीगेर यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली असून एका खाजगी कंपनीमध्ये मध्ये काम करत असून पगार कमीच आहे.इ एस आय ची व्यवस्था आहे मात्र आवश्यक प्रणाली पूर्ण न केल्यामुळे त्याचा लाभ देखील मिळणे अशक्य आहे. उपजीविका करण्यासाठी सदर रुग्ण गणपतीच्या मूर्ती देखील बनवत असते.
कुटुंबातील भाऊ आणि भावजय यांच्या मदतीतून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र आता पुढील खर्चाचा डोंगर उचलणे अशक्य असून मदतीची गरज आहे.
भाऊ सुतार काम करत असून भावजय एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यामुळे लाखोंचा खर्च या कुटुंबाला उचलणे अशक्य असून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे यामुळे मदत करण्यासाठी 9663830923,90089199633 संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे